जतेत शुक्रवारी 43 जण कोरोनामुक्त | नवे 45 रुग्ण ; दोघाचा मुत्यू

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची वाढली.शुक्रवारी घेतलेल्या तपासण्यात तालुक्यात 45 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.दोघाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
 त्यात एकाच दिवशी जत शहर 12, शेगावमधिल 12 नवे रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे.सोरडी 7,माडग्याळ 2,खोजानवाडी 7,गुड्डापूर 1,तिप्पेहळ्ळी 1,देवनाळ 1,बनाळी 2 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.शुक्रवारी 43 जण कोरोना मुक्त झाले आहेत,ही एक जमेची बाजू आहे. 
जत शहर कोरोना हॉस्टस्पॉट बनले आहे.दररोज बाधित रुग्ण आढळून येत असूनही प्रशासनाकडून गंभीरता घेतली जात नसल्याचे आरोप होत आहेत.जनता कर्प्यू असतानही नागरिक रस्त्यावरून विनामास्क,सोशल डिस्टसिंग न पाळता खुलेआम फिरत आहेत.त्यांना मज्जाव करणारी यंत्रणाच कोमात गेल्याने कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहेत.

Rate Card
काही होम आयसोलेशन केले रुग्णही बाहेर फिरत आहेत.त्यामुळे कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.या सर्व प्रक्रियेत नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच दिसत नाही.तालुक्यात 306 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैंकी 233 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.तर आतापर्यत 32 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.