व्यस्त प्रशासक विस्तार अधिकाऱ्यांमुळे ग्रामपंचायतीचा कारभार मंदावला

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून गेल्या महिन्यात नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन पदभार स्विकारला आहे,मात्र पंचायत समितीचे आपले विभागातील कामकाज सांभाळून ग्रामपंचायतीना भेटी देणे भौगोलिकदृष्ट्या दळणवळणासाठी अंतर आणि वेळेचा विचार करता दमछाक करणारे ठरत आहे.
 आता कोरोनाचा प्रादुर्भावही तालुक्यात वाढत चालला आहे, अनेक गावांत बाधित आढळत आहे. दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत चालली असून ती रोखण्याचे काम करत असतानाच गावकारभाऱ्यांना आता पायउतार व्हावे लागले आहे.


Rate Card नेमलेल्या प्रशासकाकडे केवळ एकच ग्रामपंचायत नाही तर सात आठ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळायचा आहे. याशिवाय पंचायत समितीत ज्या विभागात हे प्रशासक काम करत आहे तेही सांभाळून गावगाडा चालवायचा आहे.
एकूणच कामाचा अतिरिक्त ताण या प्रशासकांना देण्यात आल्यामुळे कोरोना काळात गावकारभार कसा पाहणार हे महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच एक गाव पुर्वेला तर दुसरे गाव पश्चिमेला त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या दळण वळणामध्येच प्रशासकांचा जास्तीत जास्त वेळ जाणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये ग्रामपंचायतीकडून राबविण्यात उपाय योजनांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सात-आठ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कार्यभार असल्याने त्यांना प्रत्येक गावाला एक दिवस जरी दिला तरी पंधरा दिवसांनी प्रशासक या गावात जाईल त्यामुळे जनतेची कामे वेळेत कशी होतील. नवीन प्रस्ताव दाखल करण्याचे धाडस प्रशासकीय अधिकारी घेणार नाही. त्यामुळे गावगाडा चालण्यास अडथळा निर्माण होत आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.