शासकीय उडीद,मका विक्री केंद्र सुरू करा ; प्रकाश जमदाडे
जत,प्रतिनिधी : जत येथे शासनामार्फत मका व उडीद खरेदी केंद्र सुरू करावे,अशी मागणी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि,जत तालुका हा सर्वात मोठा तालूका असून 53 गावे खरीप व 67 गावे रब्बी पिकाखाली आहेत.साधारणपणे खरीप क्षेत्र 45 हजार हेक्टर पेरणी झालेली आहे.गेल्या 4-5 वर्षापासुन तालुक्यात अनेक शेतकरी हक्काचे पीक म्हणून मका व उडीद पेरणी करीत आहेत.यावर्षी कांही भागात पाऊस चांगला झाला आहे.
शेतकऱ्यांनी साधारणपणे 5 हजार हेक्टर क्षेत्र उडीद व 7 हजार हेक्टर क्षेत्र मक्याची पेरणी केली आहे.पाऊसमान चांगले झालेने दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले आले आहे.शासनाने उडीद हमीभाव 6100 रू व मका 1760 रू

जाहीर केला आहे. पंरतू व्यापाऱ्याकडून उडीद 4500 ते 5200 रूपये व मका 1200 ते 1350 रूपये दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी जत येथे शेतकऱ्याने उत्पादीत केलेले उडीद व मका खरेदीसाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू करावे,असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी निगडी खु.सोसायटीचे चेअरमन बालकृष्ण शिंदे,माजी संरपच अशोक गायकवाड,सचिन माने उपस्थित होते.
जत तहसीलदार यांना निवेदन देताना प्रकाश जमदाडे,बालकृष्ण शिंदे,अशोक गायकवाड,सचिन माने