बेळोंडगीत अवैध व्यवसायांवर कारवाईचा ठराव

0



उमदी,वार्ताहर : बेळोंडगी (ता. जत) येथे दारू,मटका, वाळूतस्कर, विनापरवाना मुरूम वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दारू, मटक्यामुळे अनेक संसार

उद्ध्वस्त झाले. गावातील आरोग्य धोक्यात आलेले आहे.अवैध व्यवसाय रोखण्यासाठी रवाईचा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. 


ठरावाची प्रत जिल्हा पोलीसप्रमुख सुहैल शर्मा,उमदी पोलीस ठाणे, प्रांताधिकारी,तहसीलदार यांना दिली आहे.जत पूर्व भागातील बेळोंडगीची लोकसंख्या 3 हजार 500 आहे.शांतताप्रिय व संवेदनशील अशी गावची ओळख आहे. मात्र पोलीस ठाणे, महसूल विभागाच्या दुर्लक्षाने

गावात अवैध धंदे वाढले आहेत.

Rate Card


अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. यामध्ये हातभट्टी दारू, मटका, वाळू तस्करी,विनापरवाना मुरुम वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अवैध धंद्यांमुळे गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने ठराव करून अवैध व्यवसायांवर कारवाईची भूमिका घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.