काँग्रेसकडून शिक्षक मतदारसंघात सुजाता चौखंडे-माळी यांच्या उमेदवारीला वाढती पसंती

0जत,प्रतिनिधी : काँग्रेसकडून शिक्षक मतदार संघात सुजाता चौखंडे माळी यांची उमेदवारीसाठी वाढती पसंती मिळत आहे.शिक्षकांचे प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या सुजाता चौखंडे माळी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहेत.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल राज्य उपाध्यक्ष म्हणून राज्यभर संपर्क दौरे केले आहेत.शिक्षक सेलचा राज्य उपाध्यक्ष पदाचा धुरा समर्थपणे सांभाळत वेगळी ओळख निर्माण केलेल्या सुजाता चौखंडे माळी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेेत.माळी यांनी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे या पाचही जिल्ह्यात संपर्क अभियान राबवले आहे.


माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे,

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण राज्यमंत्री विश्वजीत कदम,कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह पाच जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळींची त्यांनी भेट घेत आपण या मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत,हे सांगितले आहे.पक्षाकडे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारची मागणी त्यांनी केली आहे.


Rate Card

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे.शिक्षण संस्थेचे प्रश्न शाळेचे अनुदान मिळण्याबाबत त्यांनी प्रयत्न केले आहे.राज्यातील अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि वर्ग तुकड्यांना अनुदानसहित घोषित करा,या मागणीसाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.हजारो शिक्षक पंधरा ते वीस वर्षे काम करून सरकारच्या निकषास पात्र असूनही वेतन मिळत नाही. कुटुंब चालवण्यासाठी काही शिक्षकांना मोलमजुर करावी लागत असल्याचेही त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे.याशिवाय घोषित शाळांना अनुदान वितरित करण्यासाठी व सेवा संरक्षण टीईटी ग्रस्त शिक्षकांचे प्रश्न मांडले.कोरोनाच्या भयानक परिस्थिती सुद्धा मुंबईत शिक्षण मंत्री व वित्त मंत्री यांच्याशी बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केला आहे.


शाळांच्या अनुदानाचा प्रश्न शिक्षकांना पदोन्नती या प्रकरणी लक्ष घालून आणि त्यांच्या प्रलंबित कामाची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.शैक्षणिक क्षेत्राशी निगडित विविध विषयावर काम केल्यामुळे पुणे विभागात त्या परिस्थितीत आहेत त्यांच्या कामाची दखल पक्षाकडून घेतली जाईल,असे पक्षाचे वरिष्ठ वर्तुळात तून सांगितले जात आहे.जिल्ह्यातून माळी यांच्या उमेदवारीला शिक्षक वर्गातून पाठिंबा मिळेल असा आशावाद काँग्रेस शिक्षक सेल मधील पदाधिकारी बाळगून आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.