रस्त्यावरील वाहतूक झाली जीवघेणी | विजापूर-गुहागर, जत-सांगली,सांगोला-अथणी महामार्ग होणार कधी ?

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील काम रखडल्याने रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असून, वाहनधारकांना ते धोकेदायक ठरत आहेत. त्यात पावसामुळे भर होवून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून रस्त्यावर जणू तलावच निर्माण झाला आहे, असे दिसून येत आहे. हे धोकेदायक खड्डे अपघाताला कारणीभूत ठरू पहात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित दुरूस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यानच्या महामार्गावर पावसाळ्यापूर्वीच जागोजागी खड्डे निर्माण होवून वाहनधारकांना त्रासदायक झाले होते. वाहनधारकांना या महामार्गावर वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.त्यातच खड्ड्यात पावसाचे पाणी साचून महामार्गावरच जणू तलाव निर्माण झाल्याने या मोठमोठ्या खड्ड्यात चिखलमय पाणी साचून समोरून येणाऱ्या वाहनामुळे अंगावर उडणार नाही याची काळजी घेताना वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे.

त्याचबरोबर जत शहरातील दुसरा राष्ट्रीय मार्ग असणाऱ्या जत-सांगली मार्गावरील छत्रपती संभाजी चौका नजिकचा गधर्व नदीवर पुुुुलावर देखील मोठमोठे खड्डे पडले असून पूल अगोदरच कमकुवत झाला आहे.
या पुलावर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून तो धोकेदायक ठरू पाहात आहे. या पुलावरील वाहनांची वर्दळ, त्यात पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना मोठे वाहन आले की, जीवमुठीत धरून मार्ग काढावा लागतो.अरुंद  पुलावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांतर्फे पादचारी पुलाची मागणी वेळोवेळी केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्याशिवाय छ.संभाजी चौकातून छ.शिवाजी महाराज चौकापर्यतचा रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच दुकानदार अतिक्रमण करून रस्त्याचे मालक झाल्याने रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.


Rate Cardत्याच्या जोडीला खड्ड्याची मालिका जीवघेणी ठरत आहे.छ.शिवाजी महाराज पुतळा ते पोलीस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या दुफर्ता अतिक्रमे थेट रस्त्यापर्यत आल्याने एकाच वेळी दोन वाहने जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.ग्रामीण रुग्णालय, तहसीलदार,विद्यामंदिर,तहसील,पंचायत समिती,न्यायालय,प्रांत कार्यालय,पोलीस ठाणे यांच मार्गावर आहे.शासकीय कार्यालयाला खेचून थेट रस्त्यापर्यत स्टॉल धारकांनी अतिक्रमणे केल्याने मोठ्या कसरतीने वाहने चालवावी लागत आहेत.जतच्या दुरावस्थेला ही खड्डेयुक्त रस्ते व अतिक्रमणे कारणीभूत आहेत.मालकी हक्क प्रस्तापित करत अगदी शासकीय कार्यालयाच्या भिंतीचे विद्रुपीकरण केले आहे.तालुक्यात सुंदरतेला आदेश देणारे, येथून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना हे विद्रुपीकरण दिसत नाही हे विशेष..

दुसरीकडे सांगोला – अथणी राष्ट्रीय महामार्गाचे सांगोलाकडून जतपर्यतचे काम करण्यात येत आहेत. तेही शहरातील काम करताना अनेकवेळा बंद ठेवण्यात येत आहेत. हॉटेल संस्कृती ते पुढे अंबाबाई मंदिर मार्गापर्यतच्या रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.खड्डे पाचवीला पुजलेले आहेतच.त्याशिवाय अतिक्रमणामुळे रस्ता अंरूद झाला आहे. या तिन्ही महामार्गाची शहरातील कामे होणार आहेत तरी कधी असा संतप्त सवाल जतकरांतून विचारला जात आहे.जत शहरातील दोन्ही मार्गाची झालेली दुरावस्था

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.