रेवनाळ मधिल विवाहितेची चिमुकल्यासह आत्महत्या
जत,प्रतिनिधी : रेवनाळ ता.जत येथील विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या तान्हुल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी रात्री घडली.सोनाली प्रकाश गणाचारी(वय35),मुलगा प्रज्वल प्रकाश गणाचारी(वय2)अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत.याप्रकरणी रात्री उशिरापर्यत जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी,सोनाली हिचे पती प्रकाश यांच्याशी किरकोळ वादावादी झाली होती.त्याला कंटाळून सोनालीने आपल्या तान्हुल्याला पोटाला बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सोनाली रात्र झाली नाही,तरी घरी परत आली नाही,म्हणून शोधाशोध केली असता,तिचे चप्पल विहिरीत तरंगत असल्याचे दिसून आल्यानंतर तिचा विहिरीत शोध केला असता ही घटना समोर आली आहे.जत पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे.