जत शहर बुधवारी पुन्हा पाण्यात | रस्ते बनले नाले,राडेराड कायम,जनजीवन विस्कळीत

0जत,प्रतिनिधी : जत शहर बुधवारी सायकांळी पाचच्या दरम्यान झालेल्या पावसाने पुन्हा पाण्यात गेले.तासभर पडलेल्या धुवाधार पावसामुळे शहरात पाणी पाणी झाले होते.शहरातील अनेक रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहिले.

शहरातील खड्डेमय रस्त्याची बेअवस्था झाली.दरम्यान सायकांळी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

सातत्याने रखडवला जात असलेला विजापूर-गुहागर विजापूर-गुहागरमहामार्गाची अवस्था नाल्यासारखी झाली होती.चडचण रोड ते बस स्टँडपर्यतचे दुरूस्ती काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी साधारणतं: पाच फुटापर्यत हा मार्ग खोदण्यात आला आहे.त्यानंतर तब्बल महिना होत आला तरीही काम बंद आहे.गटारी बंद झाल्या आहेत. 
परिणामी गेल्या पंधरवड्यात पडत असलेल्या पावसामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिक,वाहन धारकांची बेहाल होत आहे. बुधवारी तर कहरच झाला.सायकांळी पाचच्या दरम्यान शहरात धुँवाधार पाऊस पडला.चडचडण रोडपासून बाजार समितीतून बाहेर पडणारे थेट या मार्गावरून वाहू लागले,पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने स्टँडसमोर तब्बल गुडघ्यापर्यत साठले.परिणामी दुचाकी चालकासह पायी जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.


Rate Cardत्याशिवाय छत्रपती संभाजी चौकासमोरील पुलाजवळ पाण्याचा डोह निर्माण झाला होता. त्याशिवाय शेगाव रोडकडे जाणाऱ्या होडा शोरूमसमोरील रस्त्यावर पाण्याचे डोह तयार झाला होता.बुधवारच्या पावसाने शहराची दैना उडविली होती.अनेक रस्त्यावरून थेट नाले वाहू लागल्याने दुर्गंधी पसरली होती.तर गटारी अतिक्रमणे करून

गायब केलेले रस्ते नाले बनले होते.खड्डे व उपनगरातील रस्त्याची दरवेळीप्रमाणे रस्ते चिखलमय झाले होते.सातत्याने अशी स्थिती होत असतानाही नगरपरिषद प्रशासन व विजापूर-गुहागर महामार्गावर नियंत्रण असणारे अधिकारी डोळेझाक का करत आहेत.असा प्रश्न उपस्थित होत आहे.जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गावर मोठा नाला तयार झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.