बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट | शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
जत,प्रतिनिधी : जत येथे दुय्यम बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांकडून होत असलेली शेतकऱ्यांची लूट व फसवणूक थांबवावी अन्यथा,बाजार समितीच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदन बाजार समितीला देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,जत तालुका हा दुष्काळी तालुका असून सध्या जगभरात कोरोना या आजाराने थैमान घातले,असून शेतकरी वर्ग अगोदरचं अडचणीत आला आहे.त्यामध्ये जत दुय्यम बाजार समिती आवारातील व्यापारी हे शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव न देता प्रत्येक कट्यामागे (पोत्याला)17 ते 20 किलो प्रमाणे तूट धरत आहेत.
मेंढीगिरी येथील कांबळे या शेतकऱ्यांची कट्ट्याला 20 किलो प्रमाणे तूट धरली आहे.उडीदाचे वाण,नमुना,दर्जा दाखविल्यावर जो भाव सांगितला जातो. तो माल आणल्यानंतर दिला जात नाही. भाव पाडून मनमानी पद्धतीने माल विकत घेतला जातो,तसेच मालाची पट्टी व बिले ओरिजनल दिले जात नाहीत.वटावं 2 टक्के धरला जातो.अशाप्रकारे शेतकऱ्यांची लूट व फसवणूक थांबवण्यासाठी गेली पाच वर्षे बंद असलेले सौदे चालू करावेत,शेतकऱ्यांची लूट थांबवावी.हा सर्व प्रकार जत बाजार समिती आवारातच घडत असून बाजार समिती हस्तक्षेप करत नाही,म्हणून असा प्रकार घडत आहेत.म्हणून शेतकऱ्यांची लूट व फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी,अन्यथा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बाजार समिती जत येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदन देऊन देण्यात आला आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश माळी, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अँड.सुरेश घागरे,पक्षाचे तालुका अध्यक्ष दुंडाप्पा बिराजदार,भिमराव देवकर,भैरू माळी, शहाजी साळे,भाऊसाहेब धोडमळ,आबा गावडे आदी उपस्थित होते.

जत बाजार समितीतील
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट थांबवावी या मागणीचे निवेदन देताना शेतकरी संघटनेचेे कार्यकर्ते