जतसाठी सहा व्हेटिंलेटर उपलब्ध | पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली तात्काळ व्यवस्था

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठकीनंतर आवघ्या चार दिवसात सहा व्हेटिंलेटरची व्यवस्था करत कर्तव्यदक्षता सिध्द केली आहे.जत शहरातील दोन मयुरेश हॉस्पिटल, उमा हॉस्पिटल या खाजगी कोविड सेंटरसाठी प्रत्येकी दोन व्हेंटिलेटर,जत ग्रामीण रुग्णालय येथे दोन अशी 6 व्हेटिंलेटर उपलब्ध करून दिले आहेत.

तालुक्यात 464 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर तब्बल 21 जणांना कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आढावा बैठकीत जतमधिल कोरोना परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व्हेटिंलेटर,ऑक्सीजन, डॉक्टर्स,रुग्णवाहिका,औषधे उपलब्ध करून द्यावीत,अशी मागणी आमदार विक्रमसिंह सांवत,रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, युवक नेते विक्रम ढोणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली होती.

Rate Card

त्यांनी तात्काळ याबाबत कारवाई करत सहा व्हेटिंलेटरची व शासकीय,खाजगी रुग्णालयात अतिरिक्त बेडची सोय करत पालकत्व सिध्द केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.