आवश्यकता असलेल्या रूग्णांनाच डी.सी.एच. मध्ये ॲडमिट करा

0सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गरजू गंभीर रूग्णांना तात्काळ बेड्स उपलब्ध होण्यासाठी कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व ज्यांना लक्षणे नाहीत अशा रूग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ॲडमिट न करता तपासणीनंतर आवश्यकतेप्रमाणे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोरोना केअर सेंटर किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली ठेवण्यात यावे.

ज्यांना गरज आहे अशाच रूग्णांना ॲडमिट करून घ्येण्याची दक्षता रूग्णालयांनी घ्यावी. ज्या रूग्णांची प्रकृती स्थीर आहे, अशा रूग्णांना आवश्यक तपासणीनंतर तात्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देवून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोरोना केअर सेंटर किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली ठेवावे.


Rate Card

याकामी तपासणी पथक व टास्क फोर्स टीमनेही प्रत्येक हॉस्पीटलमध्ये पहाणी करावी. ज्या रूग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये उपचाराची गरज नाही, असे रूग्ण बेड्स व्यापून ठेवणार नाहीत याची खात्री करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.