गोब्बी उद्योग समुहातील विराज ट्रँक्टर्सच्या शोरूमचे आज उद्घाटन | एस्कॉर्ट कंपनीचे सर्व मॉडेल आता जतमध्ये उपलब्ध

0
Rate Card 

जत,प्रतिनिधी : जत येथील प्रसिद्ध गोब्बी उद्योग समुहातील विराज ट्रक्टर्स या नव्या शोरुमचा शुभारंभ आज गोब्बी समुहाचे प्रमुख तथा आयकर सल्लागार चंद्रशेखर गोब्बी यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
देशातील नामवंत कंपनी विराज ट्रक्टर्स याला एस्कॉर्ट ट्रैक्टरचे अधिकृत्त सेल्स व सर्व्हिस सेंटरला  अधिकृत्त डिलर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.एस्कॉर्ट कंपनीचा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त द्राक्ष,डांळिब,ऊस स्प्रेसाठी

“FARMTRAC atom” मॉडेलचा

26 एचपी तीन सीलेडर असलेला फोरव्हील टँक्टर मॉडेलसह एस्कॉर्ट कंपनीचे सर्व मॉडेल या शोरूममध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.तसेच अत्याधुनिक वर्कशॉप,विक्री पश्चात सेवा जतमधील या विराज ट्रँक्टर्स शोरूममधून तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.शेगाव रोडवर असणाऱ्या गोब्बी उद्योग समुहातील प्रशस्त इमारतीत हे अत्याधुनिक शोरूम सुरू होत आहे.

या शोरूमच्या उद्घाटनासाठी 

एस्कॉर्ट ट्रैक्टर्स कंपनीचे राजेंद्र लोंढे,अनिल शेवाळे,प्रभात कुमार,निलेश एकल,आदिनाथ सलालकर,निलेश पाटील,प्रमोद यादव,राजेंद्र भारती,अभिमन्य भोसले हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जत तालुक्यासह कर्नाटक सीमावर्ती भागातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी नाविन्यपुर्ण ट्रँक्टर्सची सेवा देणाऱ्या आमच्या गोब्बी उद्योग समुहातील हे नवे शोरूम शेतकऱ्यांच्या सेवेत आजपासून दाखल होत आहे.यांचा शेतकऱ्यांनी फायदा लाभ घ्यावा,असे आवाहन गोब्बी उद्योग समुहाचे संचालक तथा माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गोब्बी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.