आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे पाईपलाईनच्या कामास गती

0आवंढी,वार्ताहर : म्हैसाळ योजनेचे पाणी सध्या दुष्काळी जत तालुक्यात सुरु असून पाईपलाईनच्या अपुऱ्या कामामुळे अजुन मोकाशेवाडी,सिंगनहळ्ळी,आवंढी व लोहगाव या गावांना पाणी जाऊ शकत नव्हतं,मात्र तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरचं या भागात कृष्णामाई अवतरणार आहे,अशी माहिती माजी उपसंरपच प्रदिप कोडग यांनी दिली.
कोडग म्हणाले,सध्या योजनेच्या बंधिस्त पाईपलाईनचे काम अतिंम टप्यात आहे.पाईपची मुख्य कालव्याला जोडणी,व्हॉल्व बसविणे,काही ठिकाणी जॉईटची जाेडणी आदी कामे बाकी आहेत.ही कामे गतीने करून सध्या सुरू असलेले पुराचे पाणी या भागात सोडावे,अशी मागणी आम्ही आ.सांवत यांच्याकडे केली होती.त्या अनुषंगाने आ.सांवत संबधित अधिकारी व ठेकेदारांशी चर्चा करून कामे गतीने करून या भागात पाणी सोडावे अशा सुचना दिल्या आहेत.त्यामुळे लवकरचं या भागात म्हैसाळ योजनेतून पाणी येऊन हा भाग सुजलाम,सुफलाम होणार हे निश्चित आहे,असेही कोडग म्हणाले.

सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश सोळगे म्हणाले कि,

Rate Card

आंवढीसह परिसरातील गावात अपेक्षित पावस झाला नाही.सध्या या भागात पाणी टंचाई जाणवत आहे.त्यामुळे म्हैसाळ योजनेतून सुरू असलेल्या या बंधिस्त पाईपलाईनची कामे गतीने करावीत,व पाणी सोडावे.

यावेळी शिवाजी कोडग, सुरेश कोडग,सतिश कोडग,नितिन कोडग, सचिन कोडग,संजय कोडग,सुभाष कोडग,श्रीकांत कोडग,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


आंवढी,लोहगावला पाणी जाणाऱ्या पाईपलाईनचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.