खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्या

0सांगली : सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने येथील खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे हॉस्पिटल्स या कामी नकार देतील अशी हॉस्पिटल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या उपाय योजना संदर्भात निधीची कमतरता पडणार नाही. आवश्यक तो निधी प्रशासनाकडे लवकरच सुपुर्द करण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुल येथे 110 तर शासकीय महाविद्यालय मिरज येथे 50 बेड्सचे डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल उभारणीचे काम सुरू असून लवकरच ते कार्यान्वित होईल.Rate Card

 ते कार्यान्वित झाल्यानंतर येथील रूग्णांची मोठी सोय होईल. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आढावा घेण्यासाठी विविध हॉस्पीटल्स मॅनेजमेंटशी झुम ॲपव्दारे संवाद साधावा. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी हॉस्पिटल चालविण्याचा अनुभव असणाऱ्या खाजगी तसेच निवृत्त डॉक्टरांची सेवा घ्यावी. त्याचबरोबर रूग्णालयातील उपलब्ध असणाऱ्या बेड मॅनेजमेंटचाही आढावा दररोज घेण्यात यावा, अशी सूचना करून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या बैठकीनंतर आयुक्तांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या 110 बेडच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची पहाणी केली. सांगली : विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी

जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या 110 बेडच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची पहाणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.