डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव वाढला
उमदी,वार्ताहर : जत तालुक्यात डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे दराची घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकांवरील आर्थिक खर्च आणि कमी मिळणारा दर, ही कोंडी कशी फोडायची, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.

तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र 11 हजार 344.59 एकर आहे. संख,दरीबडची, उमदी, सोन्याळ,जाडरबोबलाद,उटगी, सिध्दनाथ,आसंगी (जत) दरीकोणूर, वाळेखिंडी,काशीलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे.पूर्व भागातही शेकडो शेतकरी डाळिंब उत्पादक घेत आहेत.
