मागासवर्गीय शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित | निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

0

 

सोन्याळ,वार्ताहर : राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने  मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी सामूहिक शेततलाव योजनेतील काम पुर्ण झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना देय अनुदान दिले नसल्याने कर्जे काढून काढलेल्या शेततळ्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.तातडीने हा निधी द्यावा,अन्यथा आंदोलन करू असा इशारा लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला आहे. तसे निवेदन त्यांनी संबधित विभागाला दिले आहे.


जतच्या कृषी विभागाने आर्थिक लाभातून चुकीच्या पध्दतीने निधीचे वाटप केल्यानेच आम्ही वंचित राहिल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.पाण्याचे स्रोत निर्माण करणे,साठविलेले पाणी वाया जाऊ नये,पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगाव्यात,अशा उद्देशाने शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे.संपूर्ण 100 टक्के अनुदान या तलावांना देण्यात येत आहे.तलावात प्लास्टिक फिल्मचे अस्तरीकरण करण्याच्या सुचनाही केंद्र सरकारने दिल्‍या आहेत.जिल्ह्यात शंभरावर शेतकऱ्यांना ड्रॉ पध्दतीने लाभार्थ्याची निवड करत तलावाच्या कामांना मंजूरी दिली आहे.


यानंतर बहुतांश मागासवर्गीय शेतकऱ्यांनी कर्जे काढून मुदतीत कामे पुर्ण केले आहे.मात्र कामे पुर्ण होऊन आठ महिने झाले तरीही अद्याप अनुदान दिलेले नाही.जतच्या कृषी विभागाकडून यापुर्वी “मागेल त्याला शेततळे” अंतर्गत लाभ घेतलेल्या खुल्या गटातील लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले,तर मागासवर्गीय लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांनी जाणीवपुर्वक वगळलेल्याचे आरोप शेतकऱ्यांनी निवेदनात केले आहेत.

Rate Card


मागासवर्गीय लाभार्थी वगळले


या योजनेत मागासवर्गीय शेतकऱ्यांनी शेततळे काढूनही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील निधी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभातून खुल्या वर्गातील शेतकऱ्यांना वाटप केल्याचे आरोप आहेत.दुसरीकडे मागासवर्गीय लाभार्थ्यांना अनुदान नसल्याचे तालुक्याचे सुपुत्र असलेल्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.मात्र मागासवर्गीय शेतकऱ्यांना तात्काळ हे अनुदान वितरित करावे,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा बोर्गी,उमदी,विठ्ठलवाडी,सोन्याळमधील शेतकऱ्यांनी दिला आहे.या निवेदनावर जयश्री व्हनखंडे, शिवाजी सातपुते, चंद्रकांत सातपुते, सिद्धू शिंदे, मलकारी सातपुते, अमृत सातपुते, सजाबाई सातपुते आदींच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.