मोटारसायकल चोरट्याला अटक | 16 मोटारसायकली जप्त ; संखमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा

0



जत,प्रतिनिधी : जयसिंगपूर,सोलापूर, विजापूर परिसरात मोटारसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांने एका चोरट्यांसह ताब्यात घेत सुमारे 7,लाख 90 हजार किंमतीच्या 16 मोटारसायकली जप्त केल्या.

मा.पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा सो सांगली, अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले सो सांगली यांनी सांगली जिल्हयातील वाढत्या मोटार सायकलीचे चोरीचे प्रमाण पाहून पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत पिंगळे यांना सदर बाबतचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या त्या प्रमाणे मा.पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी खास पथके तयार करून रेकॉर्डवरील आरोपी व संशयीत यांचा शोध करण्या करीता आदेश दिले होते

त्या अनुषंगाने आज दि.२९/०८/२०२० रोजी जत विभागामध्ये पेट्रोलिंग करत रेकॉर्डवरील आरोपी व संशयीत यांची माहिती घेत असताना प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांना बातमीदारामार्फत बातमी

मिळाली की, इसम नामे – सागर पवार रा. पांडोझरी, पारधी वस्ती, ता.जत हा चोरीतील मोटरसायकलसह संख परिसरामध्ये फिरत आहे. 

Rate Card

अशी बातमी मिळाल्याने त्यास पथकासह सापडा रचून संख गावी मोटर सायकलसह त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सागर मोहन पवार वय २३ रा. पांडोझरी, पारधी वस्ती, ता.जत असे सांगितले. सदर इसमासकडे मोटर सायकलचे कागदपत्रा बाबत विचारना केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याचे ताब्यात असणारे मोटर सायकल ही त्याने जत येथून चोरल्याची कबुली दिली. सदर मोटर सायकल बाबत माहिती घेतली असता जत पोलीस ठाणे येथे मोटर सायकली चोरी झाले बाबतचा गुन्हा नोंद असलेचे मिळूण आले. त्या बाबत सदर संशयीत इसमाकडे अजून कसून

चौकशी केली असता त्याने जत, जयसिंगपूर, सोलापूर, विजापूर या ठिकाणी त्याचे मित्रासह मोटर सायकल चोरी केले बाबत व सदरच्या मोटर सायकली पांडोझरी गावी, पारधी वस्ती येथे असलेचे सांगितल्याने सदर ठिकाणी पथकासह छापे टाकून एकूण १६ मोटर सायकली – ७,९०,३००/- रु चा मुद्देमाल ताब्यात घेवून पुढील तपास कामी आरोपी व मुद्देमाल जत पोलीस ठाणेकडे देण्यात आला आहे.

सदर कामगिरी ही पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अभिजीत सहा. पोलीस फौजदार अच्युत सुर्यवंशी, जितेंद्र जाधव, सतीश आलदर, मच्छिद्रं बर्डे, राजाराम मुळे, राजु शिरोळकर, संजय पाटील, आमसिध्दा खोत, सागर टिंगरे, मुदस्सर पाथरवट, प्रशांत माळी,

आर्यन देशिंगकर चालक अरुण सोकटे, शंकर पाटील यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.