डॉ.आरळी यांच्या सीनर्जी हॉस्पिटलला देवेंद्र फडणवीस यांची भेट

0



जत,प्रतिनिधी : जतचे प्रसिद्ध स्ञीरोग तज्ञ डॉ.रविंद्र आरळी यांनी मिरजेत सुरू केलेल्या सीनर्जी हॉस्पिटलला सांगली दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत डॉ.आरळी यांचे कौतुक केले.जतसारख्या दुष्काळी भागातून डॉ.आरळी यांनी सुरू केलेल्या वैद्यकीय व्यवसायाचे आरोग्य पंढरी मिरजेत नव्याने अत्याधुनिक सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करत प्रवेश केला आहे.





सिनर्जी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या सर्व विभागाला फडणवीस यांनी भेट देत पाहणी केली.सिनर्जी हॉस्पिटलमध्ये डॉ. रविंद्र आरळी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी रुग्णालयातील विविध विभागांना भेटी देऊन वैद्यकीय नगरी मिरज शहरात सिनर्जीमुळे मोठी भर पडली असून, रुग्णालयातील कोविड सेंटर कोरोना काळात महत्त्वाची भुमिका बजावत आहे.


Rate Card



कोरोनाशी दोन हात करण्यासाठी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर,निताताई केळकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शेखर इनामदार, महापौर गीताताई सुतार,माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.



मिरजमधिल डॉ.आरळी यांच्या सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.