उमदीतील बाजार समितीच्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार : तम्मनगौडा रवीपाटील

0जत,प्रतिनिधी : उमदी येथे बाजार समिती उभारणीकरिता गेल्या कित्येक वर्षापासून जमीन खरेदी करण्यासाठी स्वतःआमदार विक्रम सावंत यांनी पुढाकार घेतला असुन लवंगा येथे कारखान्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमीन खरेदी केल्याप्रमाणे बाजार समितीच्या नावाखाली जमीन खरेदी करून टक्केवारी मिळवण्यासाठी खटाटोप सुरु आहे. तसेच या अगोदर झालेली जमीन खरेदी भ्रष्टाचारातच अडकली असताना नवीन जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणात आमदार विक्रम सावंत यांनी टक्केवारी मिळण्यासाठी शेतकऱ्याला कमी किंमत देवून स्वतः आमदार जमीन खरेदीत दलाली खाण्याचे काम करत आहेत.

त्यामुळे या जमिनीची सखोल चौकशी होवुनच खरेदी व्हावी अशी मागणी माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.तम्मानगौड़ा रवी पाटील म्हणाले की,उमदी येथे उमदी-जत रस्त्यावरती बाजार समिती साठी जमीन खरेदी करण्यासाठी आमदार विक्रम सावंत यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यासाठी धडपड सुरू आहे त्या शेतकऱ्यांला कवडीमोल किंमत देवून जमीन खरेदी करणे व वरील उर्वरित रक्कम आपल्या व बगलबच्चे यांच्या खिशात कशा प्रकारे घालता येईल यासाठी स्वतः आमदार प्रयत्न करत असल्याचे पाटील म्हणाले. तसेच बाजार समितीसाठी जमीन खरेदी करण्यासाठी निविदा काढुन सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन जमीन खरेदी करणे आवश्यक आहे.


Rate Cardजमीनीची योग्य ती रक्कम शेतकऱ्यांना देवून बाजार समितीला ही फायदा झाला पाहिजे. अशा प्रकारे व्यवहार होणे आवश्यक असताना चुकीच्या पध्दतीने जमीन खरेदी व्यवहार करून आपला व आपल्या बगल बच्याच्या फायद्याकरिता शेतकऱ्यांना कवडीमोल किंमत देत जमीन खरेदी

करण्यात येत असलेल्या जमिनीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी,अशी मागणी तम्मानगौडा यांनी पत्रकार बैठकीत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.