जतेत आठ कोरोना पॉझिटिव्ह ; दोघाचे मुत्यू

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा चिंता,भितीचे वातावरण पसरले आहे.जत तालुक्यात नवे 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तर दोघाचा मुत्यू झाला आहे.

मयतमध्ये जत शहर व साळमळगेवाडी तील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.तर कोरोना बाधितामध्ये जत शहर 2,वाळेखिंडी 3,बेवनूर 1,माडग्याळ 1,साळमळगेवाडी 1 अशा आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जत तालुक्यात मोठ्या झपाट्याने कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. तालुक्यात आतापर्यत 327 जण बाधित आढळून आले आहेत.आतापर्यत 14 जणांचे मुत्यू झाले आहेत.

जत शहर हॉटस्पॉट बनले आहे.शहरात सातत्याने कोरोना बाधित आढळून येत आहेत.दरम्यान शहरातील बाधित संख्या वाढत असूनही शहरात खबरदारी घेण्यात नागरिक,प्रशासन गंभीर नसल्याचे समोर येत आहे. शहरात कोरोना बाधिताचा आकडा शंभरापुढे गेला असतानाही कोणतेही नियम नागरिक पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात मास्क,सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शहरात पोलीसाकडून कारवाई होताना दिसत नाही.शहरात सध्या आरोग्य,महसूल,नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी राबताना दिसत आहेत.मात्र पोलीसाचा यात सहभाग नाममात्र दिसत आहे.अधिकाऱ्यांचे याकडे पुर्णत; दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिक बेजबाबदार वागत आहेत.त्यांना कोरोनाची भिती नाहीच,पंरतू पोलीसांना तर कोन भितीच नसल्याचे समोर येत आहे.

Rate Card

गरीबाचे हाल

शहरात काही बेजबाबदार नागरिकांचा फटका गरीब नागरिकांना फटका बसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.