जत शहरात पुन्हा जीवघेणी वाहतूक कोंडी

0जत,प्रतिनिधी : जत शहरात पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.शहरातील विजापूर-गुहागर मार्गा लगतच्या दुकानदारांचा माल थेट मालवाहतूकीची वाहने रस्त्यावर लावून उतरविले जात असल्याने अनेक वेळा बसस्टँड परिसरात जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे.

कोरोनामुळे संथ झालेली वाहतूक पुन्हा गतीमान झाली आहे.शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या विजापूर-गुहागर मार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे.त्यात कधीतरी गती असते,अन्यथा बऱ्याच वेळा ते बंदच असते.मुर्दाड ठेकेदार व संबधित विभागाचे बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे खड्ड्याच्या मार्गामुळे जतकरांचे पाठीचे आजार जडले आहेत.त्यातच कोरोनानंतर सुरू झालेल्या दळणवणामुळे वाहतूक वाढली आहे.त्यातच रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे.त्यातच रस्त्याच्या कडेंना खाजगी वाहनाचे तळ बनले आहेत.Rate Card


त्याशिवाय या मार्गाचे कडेला असलेल्या दुकानदारांच्या माल वाहतूकीची वाहने थेट रस्त्यावर उभे केले जात आहेत.त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा फटका वाहन धारकांना होत आहे.जत शहरातील विजापूर-गुहागर रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी जीवघेणी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.