जतमध्ये बँकाकडून सोशल डिस्टसिंगला हारताल | गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढला ; अधिकारी बेफीकीर

0



जत,प्रतिनिधी : जत शहरात कोरोना रुग्णाची संख्या शंभरावर पोहचली असतानाही,शहरातील बँकामध्ये खबरदारी घेतली जात नसल्याने कोरोनाला एकप्रकारे निमत्रंण देण्याचा प्रकार घडत आहेत.जत शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने आढळून येत आहेत.शहरातील बँकांना याचे कोणतेही गांर्भिर्य नसल्याचे समोर येत आहे.





जत शहरात राष्ट्रीयकृत्त बँकाबरोबर जिल्हा,अर्बन, सहकारी बँका मोठ्या प्रमाणात आहेत.सध्या लॉकडाऊननंतर बँकाचे व्यवहार गतीने सुरू आहेत.त्यामुळे प्रत्येक बँकात मोठ्या प्रमाणात खातेदार गर्दी करत आहेत.त्यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना या बँकाकडून होत नसल्याचे समोर येत आहे.बँकाच्या बाहेर सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक दिसतात.मात्र बँकामध्ये मोठी गर्दी असते.अनेक खातेदार विना मास्क येतात.सँनीटायझर,सोशल डिस्टसिंगला हरताल फासला आहे.एकीकडे प्रशासन कोरोना रोकण्यासाठी जीवाचे रान करत असताना या बँका भविष्यात कोरोना प्रसाराचे केंद्रे बनल्यास वावगे ठरणार आहेत.

Rate Card




जत शहरातील मार्केट यार्डातील एका बँकेतील परिस्थिती धोका स्पष्ट करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.