योग्य आहार,औषधोपचाराने कोरोनावर मात करता येते ; डॉ.चंद्रमणी उमराणी

0सकारात्मक विचार प्रबळ इच्छा शक्ती, योग्य आहार,औषधोपचार यांच्या जोरावर आपण कोरोना वरती विजय मिळवू शकतो. मीही  मागील महिन्यात कोरोना बाधित झालो होतो परंतु वरील उपाययोजनाने एका आठवड्यातच मी कोरोनातुन रोग मुक्त होऊन रुग्णसेवा करण्यास सज्ज झालो आहे.लोकांनी कोरोनाबद्दल अनाठायी भीती न बाळगता अफवा आणि गैरसमज यापासून लांब राहून कोरोनावर सहज मात मिळवता येते असा विश्वास माडग्याळ येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉ.चंद्रमणी उमराणी यांनी व्यक्त केला.

माडग्याळ येथे मी गेल्या 24 वर्षापासून संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय सेवा देत आहे. साथीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला,अशा कठीण प्रसंगी,रुग्ण माझे दैवत मानून माझे रुग्णालय सुरू होते. परंतु लॉकडाऊन उठले व रुग्ण सेवा देताना 23/07/2020 रोजी गुरुवारी रात्री मला घसादुखी,अंगदुखी,थंडी ताप अशी लक्षणांची सुरुवात झाली.आयसीएमआर व डब्लूएचओ च्या नियमानुसार मी प्राथमिक उपचार चालू केला 25/07/2020 रोजी डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी जत यांच्या वैद्यकीय सल्ला घेतला स्वाब टेस्ट तपासणीसाठी दिला.मी सर्व 

अ‍ॅसेप्टिक खबरदारी घेऊन रुग्णसेवा देत होतो, लॉकडाऊन पासून घरातही मी अलगीकरण मध्ये राहत होतो.त्यामुळे मला कोरोना संसर्ग होणार नाही.माझी टेस्ट निगेटिव्ह  येईल असा मला विश्वास होता.मात्र टेस्ट रिपोर्टला विलंब झालेमुळे व घसादुखी कमी न झालेमुळे मी कान नाक घसात तज्ञ डॉ.सुधीर कदम यांच्याकडे मिरजेला जाऊन तपासून घेतले. त्यांच्या सल्ल्याने त्याच दिवशी एचआरसीटी टेस्ट केली.त्यामध्ये सौम्य कोविड न्यूमोनियोची लक्षणे आढळली व त्याच दिवशी सायंकाळी 

आरटी पीसीआर चाचणी सकारात्मक आली. त्यामुळे मी तातडीने भारती हॉस्पीटल सांगली येथील कोवीड सेंटर मध्ये ऍडमीट होण्याचा निर्णय घेतला,तिथे तीन दिवसाच्या उपचारानंतर माझ्या सर्व चाचण्या निगेटीव्ह आल्या.माझ्यात सौम्य लक्षणे असल्यामुळे मला चौथ्या दिवशी भारती हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांच्या सल्ल्याने सात दिवस जत कोविड सेंटर मध्ये अलगीकरण साठी राहिलो.10 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करून संपूर्ण कोरोनमुक्त झाल्यावर जत येथून डिस्चार्ज मिळाला व सात दिवस होम कोरंटाईनसाठी दिले.असा संपूर्ण 21 दिवसांचा कालावधी पूर्ण करून दि. 13/08/2020 ला संपूर्ण कोरोनमुक्त होऊन दि.14/08/2020 पासून  मी पुन्हा रुग्णसेवेत रुजू झालो.यातील जमेची बाजू म्हणजे मला संसर्ग झाल्या पासूनच्या पहिल्या दिवसापासून मी पूर्णत: अलगीकरण राहिलो होतो. दवाखाना बंद ठेवला,म्हणून माझ्यामुळे संसर्ग पसरला नाही.माझ्यामुळे इतरांना कोरोना पसरवू नये म्हणून खबरदारी घेतली. माझ्या रुग्णालयातील सर्व कर्मचारी व माझे कुटुंबीय या सर्वांचे घेतलेले टेस्ट निगेटिव्ह आल्या व माडग्याळ कॉरोना हॉटस्पॉट  होण्यापासून वाचवले.त्वरित निदान, योग्य औषधो उपचार संपूर्ण विश्रांती,या गोष्टीमुळे आपण करोनोमुक्त होऊ शकतो.कोरोना आजारामुळे लोकामध्ये भीतीचे वातावरण आहे, अनेक गैरसमज आहेत.97 टक्के लोकामधे सौम्य लक्षणे असतात ती उपचाराने बरी होतात, 3 टक्के लोकामध्ये याची तीव्रता जास्त असते.त्याही योग्य काळजी आणि उपचाराने बरे होतात.त्यामुळे कोरोनाला महाभयंकर आजार समजून लोकांनी घाबरून न जाता डॉक्टरचा वेळीच योग्य सल्ला घ्यावा  असे आवाहन यावेळी डॉ उमराणी यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्गा टाळण्यासाठी

 1.फेसमास्क किंवा साधे मास्क वापरावे

 2. साबणाने हाताची वारवार स्वच्छता करावे,   3. सोशल टिस्टसिंग पाळावे  

 4.गर्दीची ठिकाणे टाळावे 

ह्या चतुसूत्रीचा सर्वांनी काटेकोरपणाने अवलंब करावा. वरील नियमाचे पालन करून संसर्ग  रोखण्यास आपण निश्चितच मदत करू शकतो. कोरोना होऊ नये म्हणून लोकांना व्यसनापासून अलिप्त राहावे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.


 


Rate Card

चौकटीत


“रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा”

मानून डॉक्टर मंडळीकाम करत असतात करोना संकाटतही आपल्या जत तालुक्यतील खाजगी डॉक्टर  तसेच सरकारी डॉक्टर चांगले काम करीत आहेत पण सेवा देताना त्यांनाच बाधा झाली तर संबंधितांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी कोविड सेंटरमध्ये काही बेड राखीव ठेवायला हवेत. कारण वैद्यकीय उपचार देणारे डॉक्टर बरे होऊन पुन्हा अनेक रुग्णांना वाचवण्यात मदतीला येणार आहे. कोरोना बाधीतावर उपचार सुरु असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचारयांना रोज अग्निदिव्यातून जावे लागते.यापूर्वी जिल्ह्यातील अनेक कॅम्पऊंडर  आणि नर्स कोरोना रोगाने बाधित झाले आहेत, त्यांना तात्काळ उपचार भेटणे आवश्यक असते. अशावेळी त्यानाही  कोविड सेंटरमध्ये बेड मिळण्यासाठी अडचणी  येत आहेत. त्यांच्यासाठी बेड राखीव असावेत, अशी प्रशासनाला विनंतीसुद्धा डॉ उमराणी यांनी यावेळी केली आहे. डॉ.चंद्रमणी उमराणी

संजीवनी हॉस्पिटल,माडग्याळLeave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.