बोगस डॉक्टरांमुळे आरोग्य धोक्यात | कारवाईची अपेक्षा : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

0



जत,प्रतिनिधी : शासकीय आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचा फायदा गावागावात सक्रिय झालेले बोगस डॉक्टर घेत असून यामुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुका आरोग्य विभागाला या बोगस डॉक्टरांवर कारवाईचे अधिकार असताना त्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.  तालुक्याची लोकसंख्या पाााचच लाखांच्या घरात आहे.

तालुक्यात 116 गावे व 116 ग्रामपंचायती आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर माडग्याळ येेेेथे ग्रामीण रुग्णालय,जत येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. तालुका डोंगरात भागात वसलेला आहे. त्यामुळे या परिसरात आरोग्य सुविधा मिळणे कठीण जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात नियुक्त डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. याच संधीचा फायदा बोगस डॉक्टर घेत आहे. तालुक्यात गावागावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी उघडली आहे. वैद्यकीय ज्ञान नसताना साध्या ताप, खोकल्यापासून ते विविध दुर्धर आजारावरही उपचार करतात.

बोगस डॉक्टरांची शहरातील औषध विक्रेत्यांशीही साटेलोटे असून यातून रुग्णांची लूट होत आहे. तालुक्यात काही बंगाली डॉक्टर व पॅथॉलॉजीची पदवी घेतलेले अनेक जण वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. चुकीच्या उपचारामुळे अनेक रुग्णांनी अपंगत्व ओढवून घेतले आहे. तर काही जण किडणी सारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण झाले आहे. एकंदरित ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असला तरी आरोग्य यंत्रणेचे मात्र त्यांच्यावर लक्ष दिसत नाही. 



Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.