जतच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम रखडले

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक उपचार देण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या 50 बेडच्या जत येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम रखडले आहे.तालुक्यातील जत शहरासह सुमारे 123 गावातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात म्हणून तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते या रुग्णालयाचे 20 ऑक्टोबर 2018 ला उद्घाटन झाले आहे.





Rate Card

उद्घाटन नंतर रुग्णालयाचे काम गतीने सुरू झाले होते.मात्र गेल्या चार महिन्यात अगदी संथ गतीने हे काम सुरू आहे.रुग्णालयाचे पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या स्लबचे काम करण्यात आले आहे.उर्वरित मोठ्या प्रमाणातील कामे बाकी आहेत.सध्या कोरोना काळात अशा रुग्णालयाची जतकरांना गरज आहे.बांधकाम विभागाच्या अख्यत्यारित असलेले हे काम गतीने करावे अशी मागणी होत आहे.



जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.