जिल्हाचा कोरोना मुत्यूदर कमी करा ; महेश खराडे

0सांगली,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात सर्व यंत्रणा सज्ज आहे, ऑक्सिजन व्हेंटिलेटर याची कोणतीही कमतरता नाही असे जिल्हाधिकारी सांगत आहेत.मग जगात सर्वात जास्त मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा कसा याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे.नव्हे हा मृत्यू दर कमी करण्यासाठी त्यांनी उपाय योजना कराव्यात असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे 

सांगली जिल्ह्याची कोरोना रुग्णाची संख्या दहा हजाराच्या आसपास पोहचली आहे मात्र रुग्ण उपचारासाठी बेड देता का बेड असे म्हणून दारोदार हिंडत आहेत.बेड मिळविण्यासाठी लागणारा वेळ आणि व्हेंटिलेटरची अपुरी संख्या यामुळेच मृत्यू दर वाढला आहे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ची संख्या कमी आहे जिल्ह्यात शासकिय रुग्णालयात 70 व्हेंटिलेटर आहेत तर खाजगी रुग्णालयात 47 व्हेंटिलेटर आहेत म्हणजेच जिल्ह्यात व्हेंटिलेटर चिंसंख्या फारच कमी आहे त्या शिवाय ऑक्सिजन बेडची संख्याही अपुरी आहे.या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना हॉस्पिटल मधून दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये हेलपाटे मारावे लागतात बेड देता का बेड अशी आर्त हाक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक मारत असतात यात जाणारा वेळ रुग्णाच्या जीवावर बेत्त त आहे हा वेळ कमी झाला तर निश्चित मृत्यू दर कमी होवू शकतो पण यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल.

Rate Card
सर्व तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर असणारी किमान 500 बेड ची सोय असणारी हॉस्पिटल उभी करणे आवश्यक आहे त्याच बरोबर सांगलीत 1000 बेडचे ऑक्सिजन व्हेंटिलेटर सह सुसज्ज हॉस्पिटल उभे करणे आवश्यक आहे त्याच बरोबर मिरज लॅब मधून रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्याने उपचारा साठी दिरगाई होते तसेच संबधित रुग्ण रिपोर्ट वेळेवर न मिळाल्याने पॉझिटिव्ह रुग्ण ही हिंडत बसतात त्या काळात ते अनेकांना कोरोनाचा प्रसाद वाटप फिरतात,त्यामुळे रुग्णाची संख्या वाढीला हातभार लागत आहे.सर्व काही आलबेल आहे असे जिल्हाधिकारी सांगत असले तरी ते वास्तव नाही ग्राउंड रियालिटी भयानक आहे म्हणूनच जगाचा मृत्यू दर 3.41असताना सांगलीचा मृत्यू दर चार टक्के आहे भारताचा 1.81टक्के तर महाराष्ट्राचा 3.21 टक्के आहे याचाच अर्थ सांगली जिल्ह्यात सर्व काही आलबेल नाही यंत्रणा दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे किवा जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात बसता शासकीय व खाजगी रुग्णालयात जावून प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे यंत्रणा दुरुस्त केल्याशिवाय गत्यातर नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.