जतच्या समस्येवर लक्ष घाला | माजी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना तम्मणगौंडा रवीपाटील यांचे साकडे
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कोरोनाचा वाढलेला प्रभाव रोकण्यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मदत द्यावी.जत तालुक्यात बाजार समितीच्या जमिन व्यवहारातील भ्रष्टाचार यासह अनेक विषयाची माहिती देत याबाबत आवाज उठविण्याची गरज असल्याचे आवाहन माजी सभापती तम्मणगौंडा रवीपाटील यांनी सांगली दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले.

जत तालुक्यात सध्या कोरोनाची स्थिती भहवाह बनली आहे.कोरोना बाधित रुग्ण वाढणाऱ्याबरोबर मुत्यूची संख्याही वाढत आहे.त्यामुळे तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे.आपण स्व:ता लक्ष घालून आरोग्य व अन्य प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आदेश द्यावेत.तसचे जत तालुक्यातील बाजार समितीच्या जमिन खरेदीत आमदारांनी संगनमत करून मोठा भष्ट्राचार केला आहे.त्याविरोधात विधानसभेत आवाज उठवावा,अशी मागणीही तम्मणगौंडा रवीपाटील यांनी दिली आहे.त्याशिवाय सिंचन योजना,सह अन्य समस्याचे निवेदन दिले.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील,भाजपा प्रदेश प्रवक्ते आ.गोपीचंद पडळकर,माजी आ.विलासराव जगताप उपस्थित होते.
सांगली दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जतच्या समस्येबाबत चर्चा करताना तम्मणगौंडा रवीपाटील
