कडेगावच्या पोलीस निरीक्षकाचा तरुणीवर बलात्कार

0कडेगाव : एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मदत करेन, असे आमिष दाखवून कडेगावचे पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी एका 28 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 

याबाबत हसबनिस यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत माहिती अशी, सबंधित पीडित तरुणी व तिजी आजी कराडला जाण्यासाठी कडेगाव बसस्थानकावर थांबली होती. यावेळी निरीक्षक हसबनिस यांनी लॉकडाऊन असल्यामुळे बस मिळणार नाही असे सांगून स्वतःच्या गाडीतून सोडण्याचे आमिष दाखवले. 

Rate Card

कासेगाव मार्गे कराडला जात असताना हसबनिस यांनी या तरुणीचा मोबाईल नंबर घेतला. शिवाय माझी पत्नी एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शक आहे. ती तुला मार्गदर्शनात मदत करेल,असे सांगितले.त्यांनतर हसबनिस यांनी त्या तरुणीला आपल्या कडेगाव येथील बंगल्यावर बोलावून घेऊन वारंवार बलात्कार केला. शिवाय तक्रार केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली, अशी फिर्याद पीडित तरुणीने दिली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.पोलिसांना जनतेचे रक्षक म्हटले जाते. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचे ब्रीदवाक्य. मात्र कडेगावच्या या प्रकरणाने रक्षकच भक्षक बनल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे खाकी वर्दी डागाळली आहे. पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.