कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात साजरी

0जत,प्रतिनिधी : मराठी साहित्य विश्वातील अस्सल ग्रामीण मराठी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य कार्यालय ,नरेश फाउंडेशन जत आणि शिवक्रांती मराठी वृत्तवाहिनी चॅनल व तसेच परिवर्तन हाॅलचे उद्घाटन समारंभ जत मधील साईनगर येथील परिवर्तन हाॅल येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स पाळून संपन्न झाला.

त्याचसोबत 10 वी 12 वी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी ट्रस्ट जतच्या वतीने सलग या चौथ्या वर्षी 24 ऑगस्ट हा दिवस बहिणा डे म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून मिरज माजी पंचायत समिती सभापती, सामाजिक कार्यकर्त्या व निवृत्त शिक्षिका श्रीमती माणिकताई माळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती माजी संचालक मंगसुळी मामा,कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून जत मधील सुप्रसिद्ध डॉ.मनोहर मोदी हे उपस्थित होते.
Rate Cardउपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.विशेष म्हणजे माळी मॅडम यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या संपूर्ण जीवनाविषयी मनोगत व कविता सादर केल्या,त्याचसोबत नवीन पिढीने आदर्शवंत जीवन कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन केले.पुढील वर्षाचा बहिणाबाई चौधरी जन्मशताब्दी सोहळा कळंबी येथे घ्यावा अशी विनंती केली.तसेच सर्वोतोपरी मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली. 

डॉ. मनोहर मोदी साहेब म्हणाले,जत सारख्या भागात बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या काम कौतुकास्पद आहे.भविष्यात ट्रस्टच्या सामाजिक कार्यक्रमात योगदान देऊ असे आश्वासन दिले.
अध्यक्ष राजू सावंत यांनी प्रस्तावना सादर करून आजतागायत केलेल्या कामाचा पाढा वाचून बहिणाबाई चौधरी यांच्या बद्दल स्वरचित कविता सादर केल्या. भविष्यात प्रत्येक शाळा काॅलेजात कवि कट्टा उपक्रम भरवून नव कविंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या ट्रस्टचे उपाध्यक्ष व चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य दिनकर पतंगे म्हणाले,बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या भविष्यात विशेष कार्यक्रम आयोजित करून जागृत्ती करू.

सचिव राजेन्द्र आरळी,कार्याध्यक्ष सुषमा मदने यांनी मनोगते व्यक्त केले. कोषाध्यक्ष व कवी सहदेव माळी उर्फ एम जगदीश सर यांनी सूत्रसंचलन केले.पालक हितचिंतक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.


जत : कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.