तम्मणगौंडा रवीपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व साड्याचे वाटप

0जत,प्रतिनिधी : भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मणगौडा रवि पाटील यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदार संघात युवा नेते कामाण्णा बंडगर यांच्या पुढाकाराने आशा वर्कर्स, तसेच गरीब महिलांना साडी व मास्कचे वाटप करण्यात आले.या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ हभप तुकाराम महाराज,उपसभापती विष्णू चव्हाण,बाजार समिती संचालक विठ्ठल निकम,मा.उपसंरपच लक्ष्मण कोरे,लिंबाजी माळी,जेटलिंग कोरे,नंद्यापा कोरे,महादेव सांवत यांच्याहस्ते आशा वर्करच्या सुपरवायझर संगिता माळी हे साहित्य सुपुर्द करण्यात आले. 
Rate Card
माडग्याळ,गुड्डापूर,व्हसपेठ,अंकलगी,कुलाळवाडी,लकडेवाडी,सोन्याळ,जाडरबोबलाद,उटगी,लमाणतांडा,राजोबाचीवाडी येथील आशा वर्कर्सना हे साहित्य वाटण्यात आले.दरम्यान तम्मणगौंडा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फोन व सोशल मिडियावरून शुभेच्छा स्विकारल्या.वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम यावेळी रद्द करण्यात आले होते.


जि.प.चे माजी सभापती तम्मणगौंडा रवीपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व साड्याचे वाटप करताना हभप तुकाराम बाबा,विठ्ठल निकम,कामाण्णा बंडगर व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.