दुर्योधन कोडग घर ते येडवे घरापर्यंत कामाच्या माहितीचा फलक लावा ; श्रीकृष्ण पाटील

0जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्र.9 मधिल दुर्योधन कोडग घर ते येडवे घरापर्यंतच्या खडीकरण कामात मोठा गैरव्यवहार झाला असून या कामाची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण पाटील यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. 

पाटील याबाबत माहिती देताना म्हणाले,

जत येथिल प्रभाग क्र.9 मध्ये जत  नगरपरिषदेने दुर्योधन कोडग ते येडवे यांच्या घरापर्यंत खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. नगरपरिषदेने हे काम सुरू करित असताना हे काम कोणत्या निधितून मंजूर करण्यात आले आहे. या कामाचे संपूर्ण स्वरूप काय आहे,कामाचे ठेकेदार कोण आहेत, हे काम केंव्हा सुरू होणार व केंव्हा संपणार आहे.याबाबतची संपूर्ण माहिती दर्शविणारा फलक लावलेला नाही.त्यामुळे हे काम कोणत्या योजनेतून मंजूर आहे हे समजत नाही. त्यातच सबंधित ठेकेदाराने रस्त्यावर खडी आणून टाकली आहे.


Rate Cardरस्त्याची खुदाई न करता ही खडी फक्त पसरून टाकली आहे. या रस्त्यावर खडी पसरून टाकल्याने येथील रहिवासी यांना याचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.त्यावर रोलींग केलेले नाही.पुढे कोणते व कधी काम होणार याबाबत स्पष्टता नाही.मासंदर्भात संपूर्ण माहिती दर्शविणारा फलक लावला जात नाही तोपर्यंत हे काम आम्ही होऊ देणार नाही.असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.जत येथील दुर्योधन कोडग घर ते येडवे घरापर्यंतच्या रस्त्यावर नुसती अशी खडी पसरून ठेवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.