जतेत दोघाच्या आत्महत्या | जतेत तरूणांने,मेंढीगिरीत वयोवृद्धाने घेतला गळपास

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात बुधवारी दोघाने गळपास लावून आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.जत शहरातील मोरे कॉलनी येथे मुळ बनाळीतील खाजगी वाहनावर चालक असणाऱ्या प्रमोद बाळू चव्हाण (वय- 30)तरुणाने तर मेंढिगिरीतील 60 वर्षीय पांडूरंग आंनदा कुरणे यांनी गळपास लावून घेत जीवनयात्रा संपविली.जत पोलीसात दोन्ही घटनेचे गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, 

जत शहरातील मोरे कॉलनी येथे राहणारे मुळ बनाळीचे प्रमोद चव्हाण हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते.बुधवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी राहत्या भाड्याच्या खोलीत गळपास लावून आत्महत्या केली.याप्रकरणी संजय लक्ष्मण वाघमोडे रा.जत यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.


Rate Cardदुसऱ्या घटनेत मेंढिगिरीतील वयोवृध्द पांडूरंग कुरणे यांना दमा,हर्नियाचा त्रास होता.या आजारांना वैतागून त्यांनी राहत्या घरात पञ्याच्या अँगलला गळपास लावून आत्महत्या केली.याप्रकरणी पोलीस पाटील लक्ष्मी कांबळे यांनी पोलीसात वर्दी दिली आहे. दोन्ही घटनेतील मृत्तदेह पंचनामा करून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.प्राथमिक तपास कॉन्टेबल अमोल चव्हाण यांनी केला आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.