जत तालुक्याची कोरोना बाधित संख्या @ 250 | बुधवारी नवे सहा रुग्ण | 179 रुग्ण कोरोनामुक्त

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना बाधिताचा आकडा 250 पार झाला आहे.बुधवारी तालुक्यात नवे सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.जत शहर 3,मेंढिगिरी 1,बेवनूर 2 या गावातील बाधिताचा समावेश आहे.जत शहरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.








Rate Card

तर ग्रामीण भागात ही कोरोना पाय पसरत आहे.त्यामुळे प्रशासनाची ताराबंळ उडत आहे.एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह वाढत असताना कोरोनातून बरे होणारी संख्याही मोठी आहे.तालुक्यात आतापर्यत 179 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या 61 जणावर उपचार सुरू आहेत.तर दहा जण दगावले आहेत.








सर्व ठिकाणी आरोग्य विभागाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत.नागरिकांनी प्रशासनाचे सर्व नियम पाळावेत,असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.