म्हैसाळच्या पाचव्या टप्यातून 6 पंपाद्वारे जतकडे पाणी रवाना ; उत्तम चव्हाण | जत तालुक्यातील लाभ क्षेत्रातील तलावे,बंधारे भरण्यात येणार

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सोडण्यात येणारे पुराने पाणी म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्यातून तालुक्यात सोडण्यात येत आहे.सध्या पाचव्या टप्यातील सलगरे येथे सहा पंप सुरू करण्यात आले आहे.या पाण्यातून जत तालुक्यातील जवळपास शक्य तितक्या भागात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले असल्याची माहिती,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण यांनी दिली.

चव्हाण म्हणाले,जत तालुक्यात सध्या येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे द्राक्ष,डांळिब बागासह,ऊस व हंगामी पिकांना मोठा फायदा होणार आहे.यापुर्वी उन्हाळी अवर्तनात तालुक्यात पाणी सोडण्यात येत होते.मात्र पुर्ण पिके वाळू लागल्यानंतर पाणी सोडले जायाचे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. त्याअनुषंगाने आम्ही जत तालुक्यात पुराचे पाणी सोडावे अशी मागणी आमचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती.त्यानुसार सध्या म्हैसाळ योजना चालू करण्यात आली आहे.त्यातून सहा पंपाद्वारे तालुक्यात पाणी सोडण्यात येत आहे. Rate Card
तालुक्यातील मुख्य कँनॉलमधून डोर्ली पासून कुंभारी,जत,शेगाव,वायफळ ते सनमडी पर्यंत त्यापुढे बंधिस्त पाईपलाईनमधून आंवढी,लोहगाव,सोन्याळ,उमदीपर्यत तर बिळूर,कालव्यातून पश्चिम भागातील अंकले,डफळापूर,मिरवाड,शिंगणापूर,देवनाळ कालव्यातून बिळूर पर्यत मुख्य कँनॉलने तर एंकूडी,वज्रवाड,खलाटी,जिरग्याळ,उमराणी परिसरात बंधिस्त पाईपलाईनमधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बंधिस्त पाईपलाईनची उर्वरित कामे गतीने सुरू आहेत.शक्य तेथपर्यत पाणी सोडण्यात येणार आहे.भविष्यात नैसर्गिक उताराने देवनाळ कालव्यातून पुढे संख तलावापर्यतही पाणी सोडण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना ना.पाटील यांनी दिल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. या पुराच्या पाण्यामुळे जत तालुक्यातील शेतीला चांगले दिवस येणार आहेत.त्याशिवाय उन्हाळी अवर्तनाचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.आमचे नेते,जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी जत तालुक्यात पुराचे पाणी म्हैसाळ योजनेतून सोडू असा शब्द दिला होता.तो पुर्ण केल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.