थकबाकीदार असताना खासदारांना पुन्हा कर्ज का ? | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

0सांगली,प्रतिनिधी ; जिल्हा मध्यवर्ती बँक थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, कर्जमाफी स पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनीही कर्ज देत नाही मात्र तीच बँक थकबाकीदार असलेल्या खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मात्र मेहेरबान झाली आहे.त्यांच्या तासगाव साखर कारखान्यासाठी 30 कोटींचे कर्ज वाटप करण्याच्या तयारीत आहे. 


शेतकऱ्यांना एक न्याय आणि खासदारांना वेगळा न्याय का असा सवाल करून या मनमानी विरोधात कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्याचा बँके विरोधात मोर्चा काढू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे

खराडे म्हणाले खा.संजयकाका पाटील यांच्या पलूस येथील दिव्हा इन् फूड या कंपनीचे 36 कोटींचे कर्ज थकीत आहे.या कंपनीचा जिल्हा बँकेने लिलाव ही काढला आहे.म्हणजेच संजयकाका हे थकबाकीदार आहेत ही वस्तुस्थिती आहे,त्याच बरोबर तासगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ही जिल्हा बँकेने 100 ते 125 कोटीचा कर्ज पुरवठा केला होता. तेही कर्ज ही थकीत असल्यानेच कारखाना बंद पडला आहे,राज्य बँकेने त्याची विक्री 34 कोटीना केली,हे वास्तव आहे.


पुन्हा त्याच कारखान्यासाठी जिल्हा बँक 30 कोटीचा कर्ज पुरवठा करणार आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील हे दोघेही खमके आहेत.तरीही नियम धाब्यावर बसवून कसा काय कर्ज पुरवठा करण्यात येतो आहे,हा खरा प्रश्न आहे.सारे संचालक मंडळ काय करते आहे.खासदारकीचे प्रतिस्पर्धी विशाल पाटील हे ही संचालक आहेत.बँक शेतकऱ्याची आहे,की कारखानदारांची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


Rate Cardशेतकऱ्यांना कर्ज पुरवठा नाही आणि कारखानदारांना कोठ्यवधीच्या कर्जाची खिरापत वाटण्याचा गोरख धंदा बँकेत सुरू आहे.डोंगराई 189 कोटी, महांकली 138 कोटी माणगंगा 116 कोटी, याशिवाय रामानंद सूतगिरणी 56 कोटी,खानापूर स्पिंनिंग मिल 28 कोटी,प्रथिबिंब इंडस्ट्रीज 7 कोटी, शेतकरी मिल 49 कोटी, विजयलक्षमी कॉटोन मिल 7 कोटी अशा बड्याची कोट्यवधीची कर्जे थकीत आहेत.ही वस्तूस्थिती असताना पुन्हा बड्यानाच कर्जे देण्याचा घाट घातला जातोो. आहे हे कशाचे द्योथक आहे बँक शेतकऱ्याची असताना शेतकऱ्यांना कर्जे नाकारली जात आहेत.जे शेतकरी कर्जमाफित बसले आहेत. त्याच्या नावावर कोणतेही कर्ज नाही,अश्या शेतकऱ्यांचे सिविल खराब आहे.म्हणून त्यांनां कर्ज दिले जात नाही.शेतकऱ्याच्या साठी कडक नियमावली आणि बड्या संजयकाका सारख्यांना पायघड्या घातल्या जात असतील तर हे चालू दिले जाणार नाही.या मनमानी विरोधात बँकेवर मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा खराडे यांनी दिला आहे.
तासगाव कारखाना चालू झाला पाहिजेखराडे म्हणाले तासगाव कारखाना सुरू झालाच पाहिजे,मात्र सभासद शेतकऱ्याची राख रांगोळी करून नव्हे आता बँकेची वाट लागेल,त्यामुळे बँकेने पुनर्विचार करावा अशी मागणी करत आहोत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.