कोविड ड्युटीवर अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा | शिक्षक भारतीची मागणी

0जत,प्रतिनिधी : कोविड 19 च्या सर्व्हेक्षणासाठी नेमलेल्या सर्व शिक्षकांची ऑर्डर रद्द करून शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणाच्या कामात राहून विद्यार्थ्यांना शिकवू द्या अशी मागणीचे निवेदन शिक्षक भारतीच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील व बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर यांना देण्यात आले.

यावेळी कोविड 19 अंतर्गत अधिगृहित केलेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या कार्यवाहीसाठी शासनाने काढलेल्या दिनांक 24 जून आणि 17 ऑगस्ट रोजीच्या दोन्ही पत्रांचा संदर्भातील माहिती देण्यात आली.


Rate Cardकोविड 19 अंतर्गत ज्या शिक्षकांनी चेकपोस्ट वर ड्यूटी केली आहे, त्यांना पुन्हा 50 वर्षावरील व्यक्तींच्या तपासणी सर्वेक्षणासाठी नेमणूक करण्यात आली आहे.ती रद्द करण्यात यावी याबाबत गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली व अशा शिक्षकांची ड्युटी रद्द करू असे आश्वासन दिले.यावेळी जत तालुका शिक्षक भारतीचे अध्यक्ष  दिगंबर सावंत, नेते नवनाथ संकपाळ, जितेंद्र बोराडे उपाध्यक्ष अविनाश सुतार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.जत : शिक्षक भारतीच्या वतीने बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर यांना निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.