डफळापूर | पंधरा दिवसात महामार्ग उखडला | खड्डे पडले,रस्ता दबला,पावसात डांबर वाहून गेले

0जत,प्रतिनिधी : कवटेमहांकाळ ते जत महामार्गाचे नव्याने केलेल्या रस्त्यावर पंधरा दिवसात खड्डे पडले आहेत.तर अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे.तर वरचे डांबर वाहून गेल्याचे समोर आले आहे.

कवटेमहाकांळ ते जत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे.कोल्हापूरच्या कार्यालयाकडून या रस्त्याचे काम सुरू असल्याचे जत बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.या रस्त्याच्या दुरस्तीसाठी सुमारे 19 कोटीचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.डफळापूर ते खलाटी नजिकच्या वनविभागाच्या सिमेपर्यत या रस्त्यावर डांबरीकरणाचा एक स्थराचे काम सुरू आहे.पावसामुळे हे काम थांबविण्यात आले आहे.मात्र पाठीमीगे डफळापूर गावानजिक अनंतपुर रोड,व स्टँडनजिक रस्त्यावर पंधरा दिवसातच खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी रस्ता दबला आहे.Rate Cardतर काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहून गेल्याने त्यासोबत डांबरीकरण वाहून गेल्याचे समोर आले आहे.इतका मोठा निधी देऊन अधिकारी समोर होऊनही या मार्गाचे काम दर्जाहीन झाले आहे.पुढे असेच काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याशिवाय पाठीमागील काम नव्याने करण्याची वेळ आली आहे.अशी कामे पुढे किती दिवस टिकणार हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून बेजबाबदार अधिकारी,ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.डफळापूर स्टँडजवळ पडलेले खड्डे रस्त्याचा दर्जाचे उदाहरण आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.