जतेत आता जनावराची चोरी
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात आता जनावरे चोरीच्या घटना घडत आहेत.तालुक्यात मंगळवारी दोन ठिकाणी जनावरे चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीसात दाखल झाल्या.

रामपूर येथील उत्तम शिवाजी कोळेकर यांची 80 हजार रूपये किंमतीची मुरा म्हैस मध्यरात्री चोरट्यांनी पळविली.शेगाव येथील अशोक दाजी गायकवाड यांची 50 हजार रूपये किंमतीची जर्सी गाय घरासमोरून गावातील विकास खुडे यांनी चोरून नेहल्याची फिर्याद गायकवाड यांनी दिली आहे.याप्रकरणी संशयिताचा शोध सुरू आहे.
