वाहतूक पोलीसाकडून वाहनधारकाची लुट?
जत,प्रतिनिधी : जत शहरातील वाहतूकीचा पुन्हा बोजवारा उडाला आहे.शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहनाचा ठिय्या हालायचे नाव घेत नाही.परिणामी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे.यासाठी नेमलेले वाहतूक पोलीस शहराबाहेर माल गोळा करण्यात मश्कुल असल्याचे आरोप होत आहेत.शहराबाहेर हे वाहतूक पोलीस कर्नाटक व जिल्हाबाहेरील वाहन दिसताच त्याला अडवत तपासणीच्या नावावर त्यांच्याकडून लुट करत असल्याचे सातत्यांने आरोप होत आहेत.

जेथे वाहतूक सुरळीत करण्याचा जबाबदारी असणारे पोलीस कर्मचारीच वरकमाईला चाटावलेले असतील तर वाहतूक कोंडी रोकणार कोन असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील विजापूर-गुहागर,मुख्य बाजार पेठेतील रस्त्यावर खाजगी वाहने तासन् तास उभी केली जात आहेत.त्याशिवाय मुख्य रस्तावर थेट रस्त्यावर वाहने उभी केली जात असूनही याला अटकाव किंवा कारवाई केली जात नाही.यामुळे पोलीसाकडील कारवाईचे मशीन गंजण्याचे शक्यता वर्तवली जात आहे.मशीन शिवाय पैेसे वसूली जोमात असल्याची चर्चा आहे.
