95 पंपाद्वारे म्हैसाळचे पाणी जतकडे रवाना
सांगली ; सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पुराचे पाणी दुष्काळी भागात पोहचविण्यासाठी आज म्हैसाळ व टेंभू योजनेतून पाणी उपसा सुरू करण्यात आले. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे 90 ते 95 पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याद्वारे 2000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत 15 पंप कार्यन्वित केले असून त्याद्वारे 2000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. सांगोला, कवठेमहांकाळ, आटपाडी येथील साधारणपणे 25 तलावामध्ये पाणी दिले जाणार आहे. या पाणी योजनेचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होणार आहे.
