उटगी अपघातातील जखमी चिमुकल्याचा मुत्यू

0उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील उटगी येथील उमदी-जत मार्गावर झालेल्या झालेल्या अपघातात ओम शामराव हडपद (वय-5,रा.उटगी) या चिमुकल्याला कारची धडक बसल्याने त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,उटगी नजिक उमदी-जत मार्गावर मयत ओम हडपद हा आईसोबत शेळ्या चारत होता.रस्त्यालगत तो खेळत होता.दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या नादात हत्तळी,ता.चढच जि.विजयपूर ,कर्नाटक येथील (केए-28,पी-5654)या चारचाकी कारगाडीने ओमला धडक दिली.त्यात गाडी खाली आल्याने ओम गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने जत येथे उपचार करून मिरज मध्ये पुढील उपचारार्थ दाखल केले होते.मात्र तेथे उपचार सुरू असताना ओमचा दुर्देवी त्यांचा मुत्यू झाला.
Rate Card
दरम्यान ओमवर उटगी येथे शोकाकूल वातावरणात अत्यंसस्कार करण्यात आले. तेथे त्यांच्या आई-वडीलांनी हबरडा ह्रदयद्रावक हंबरडा फोडला होता.या दुर्देवी घटनेने उटगीकर सुन्न झाले आहेत.

घटनेची उमदी पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, अधिक तपास उपनिरिक्षक नामदेव दांडगे करत आहेत.

 जत कडे वेगाने जात होती  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.