विजापूर-गुहागर महामार्गावर खाजगी वाहनाचा तळ | थेट रस्तावर वाहने पार्किंगमुळे वाहतूक कोंडी नित्यांची

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गाचे अनेक दिवसानंतर काम करण्यात येत आहे,मात्र नव्याने करण्यात आलेल्या हा मार्ग अवैध वाहने पार्किंगचे अड्डे बनत आहेत.थेट रस्त्यावर खाजगी वाहने उभी करून वाहतूकीला अडचण निर्माण केली जात आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले पोलीस कर्मचारी दिवसभर नेमके कोणत्या कामगिरीवर असतात,यावर संशोधन करण्याची वेळ आली आहे.


जत शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या वादग्रस्त विजापूर-गुहागर मार्गाचे काम बऱ्याच घडामोडीनंतर सुरू करण्यात येत आहे.शहरातील चडचण रोड ते एसटी स्टँड पर्यंत रस्त्याचे मुरमीकरण करण्यात आले आहे.तर शेगाव चौक ते निगडी कार्नर पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण काम सुरू आहे.रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे काढून रस्ता मोठा करण्यात येऊनही रस्त्यावरील खाजगी वाहनाचे पार्किंग हाटण्याचे नाव घेत नसल्याचे समोर येत आहे.दोन्ही बाजूला केलेल्या थेट रस्त्यावर खाजगी वाहने,दुचाकीचा वाहनतळ असल्यागत दिवसभर वाहनाचा ठिय्या मारलेला असतो.


Rate Cardपरिणामी महामार्गावरून जा-ये करणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.वाहने थेट रस्त्यावर लावली जात असतानाही यासाठी नेमलेले पोलीस कर्मचारी नेमके काय करतात,असा प्रश्न उपस्थित होत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.जत शहरातील मार्केट यार्ड समोर महामार्गावरचं खाजगी ठिय्या मांडला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.