सिनर्जी हेल्थपाॅईंट मल्टीस्पेशालिटी कोव्हिड-19 हाॅस्पीटलचा स्वातंत्रदिनी शुभारंभ

0जत,प्रतिनिधी : मिरज येथे नव्याने सुरू होत असलेल्या अत्याधुनिक उपचार व रूग्णांच्या सेवेसाठी 200 बेडचे ‘सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल’ व अत्यंत अल्पावधित उभारणी केलेल्या ‘हेल्थपाॅईंट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल’ या 50 बेडच्या कोव्हिड-19 हाॅस्पीटलचा शुभारंभ स्वातंत्रदिनी शनिवार दि 15 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती,

हाॅस्पीटलचे चेअरमन सुप्रसिद्ध स्रीरोगतज्ञ डाॅ.रविंद्र आरळी व व्यवस्थापकीय संचालक प्रसिद्ध उद्योजक प्रसाद जगताप यांनी दिली. 

शुभारंभानिमित्त सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

चंदनवाडी, एसटी वर्कशाॅपसमोर, मिरज येथे 200 बेडचे, सर्व सुविधायुक्त भव्य असे, सुप्रसिद्ध स्रीरोगतज्ञ डाॅ.रविंद्र आरळी यांचे सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल अत्याधुनिक उपचार व रूग्णांच्या सेवेसाठी दाखल होत आहे.


या हाॅस्पीटल मध्ये हृदयरोग विभाग ,सामान्य शस्रक्रिया विभाग,अस्थिरोग,स्रीरोग,बालरूग्ण विभाग,कान नाक घसा, मूत्रशास्र विभाग,गॅस्ट्रोएनटोरोलाॅजी विभाग,मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रिया विभाग,त्वचारोग अश्या 20 पेक्षा जास्त प्रमुख आजारावरील विभाग असून या विभागामध्ये अत्यंत अनुभवी,वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवेत असणाऱ्या सुप्रसिद्ध डाॅक्टरांची टीम रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग, औषध अतिदक्षता विभाग, रिकव्हरी रूम तसेच उपचारांसाठी दाखल झालेल्या रूग्णांसाठी महिला विभाग,पुरूष विभाग,20 पेक्षा जास्त सेमीडिलक्स रूम्स्, पौष्टिक आहार,रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहणेची सोय इत्यादी अनेक सुविधा या हाॅस्पीटलमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Rate Cardतसेच या हाॅस्पीटलमध्ये दुर्घटना उपचार विभाग,जनरल व लॅप्रोसोपीक शस्त्रक्रिया,ओपन हार्ट सर्जरी,अवयव प्रत्यारोपण, महिलांसाठी ‘मदर चाईल्ड केअर युनिट’,असे अनेक अत्याधुनिक विभाग सज्ज करण्यात आले आहेत.याबरोबरच या हाॅस्पीटलमध्ये एक्स रे, पॅथाॅलाॅजी,सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी डायगोनोस्टीक या सर्व सुविधाही येथे उपलब्ध आहेत.


तसेच सामाजिक बांधिलकी जपत,जिल्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची वाढत संख्या पहाता व ह्या कोरोनाग्रस्त रूग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत या संकल्पनेतून अत्यल्प काळात हेल्थपाॅईंट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल हे 50 बेडचे हाॅस्पीटल तयार केले आहे.या हाॅस्पीटलमध्ये एकाचवेळी 50 कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार होणार आहेत. 


या दोन्ही हाॅस्पीटलच्या शुभारंभ समारंभास शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना.जयंत पाटील, माजी मंत्री आ.सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री ना.डाॅ.विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा.संजयकाका पाटील, खा.धैर्यशील माने, माजी मंत्री आमदार विनय कोरे, माजी खा.राजू शेट्टी,आमदार मानसिंग नाईक, श्रीमती सुमनताई पाटिल, विक्रम सावंत,अनिल बाबर, सुधीर गाडगीळ,सुरेश खाडे, माजी केन्द्रीय मंत्री प्रतीक पाटील,माजी आमदार राजेश क्षीरसागर, श्रीमती जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, समित कदम, मनोज शिंदे,संजय बजाज, राहूल पावर, पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, दीपक शिंदे, मकरंद देशपांडे जिल्हाधिकारी डाॅ.अभिजीत चौधरी मनपा आयुक्त नितीन कापडणीस,पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जि.प.अध्यक्षा प्राजक्ता कोरे,महापौर गीता सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.