सिध्दार्थ पॉलिटेक्नीकमध्ये डिप्लोमा प्रवेशाकरिता अधिकृत सुविधा केंद्राला मान्यता

0



डफळापूर, वार्ताहर : श्री. उमाजीराव सनमडीकर मेडीकल फौंडेशन संचलित, सिध्दार्थ पॉलिटेक्नीक जत या कॉलेजमध्ये तंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून राबविणेत येणा-या प्रथम व थेट दितीय वर्ष डिप्लोमा इंजिनियरिंग ऑनलाईन प्रवेश प्रकियेकरिता तंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सिध्दार्थ पॉलिटेक्नीकला अधिकृत सुविधा केंद्र (एफ.सी.6452) म्हणून मान्यता मिळाली आहे,अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य श्री. दशरथ वाघमारे यांनी दिली. 





वाघमारे म्हणाले,माजी आमदार उमाजीराव सनमडीकर व डॉ.कैलास सनमडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सिध्दार्थ पॉलिटेक्निकचा नावलौकिक वाढत आहे.



Rate Card



ऑनलाइन सुविधा केंद्राद्वारे डिप्लोमा इंजिनियरिंग प्रवेश प्रकियेमध्ये सहभागी होणेसाठी ऑनलाईन

प्रवेश अर्ज भरणे,प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे व प्रवेश अर्जाची निश्चिती

करण्याची प्रकिया रावविणेत येत आहे.

हे सुविधा केंद्र जत तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांच्या सोयीचे ठरणार आहे.ऑनलाईन

प्रवेशपकिया दिनांक-, 10/08/2020 पासून सुरू झाली आहे.तरी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 उत्तीर्ण विदयार्थ्यांनी या डिप्लोमा इंजिनियरिंग ऑनलाईन प्रवेश प्रकियेमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.