चकाचक रस्त्यांना तड्डे | जत शहरातील रस्ते कामाचे सत्य बाहेर ; सहा महिन्यात रस्त्याची वाट
जत,प्रतिनिधी : जत शहरातील रस्त्याची पाऊस उघडताच वाट लागली आहे. मोठ्या दिमाखात उद्घाटन केलेल्या अनेक रस्त्यावरील चकाचक डांबरीकरण वाहून जात रस्त्यांना तडे गेले आहेत.सहा महिन्यात काही अपवाद रस्ते वगळता अनेक रस्ते कामांचे सत्य बाहेर आले आहे.
शहरातील अनेक वर्षाच्या खड्ड्यातून मुक्त करण्यासाठी थेट शासनाच्या निधीसह नगरपरिषदेच्या कोट्यावधी निधीतून अनेक रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे.यातील जवळपास सर्वच रस्त्याची कामे दुय्यम ठेकेदार असलेल्या अनेक पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवकांनी केले आहेत.या रस्त्याच्या चकाकीनंतर जत शहरातील रस्त्यावरील खड्ड्यातून नागरिकांची मुक्ती होईल अशी आशा व्यक्त होत होती.
मात्र गेल्या वर्षभरात केलेले जवळपास सर्व रस्ते उखडल्याचे समोर येत आहे.तर काही रस्त्यावरील डांबरीकरण वाहून गेल्याने खड्डी उखडली आहे.तर काही रस्त्यावर एकाच पावसात खड्डे पडले आहेत.काहींना तडे जात,रस्ते दबले आहेत. या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग,व नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या थेट पांठिबाच असल्याचे रस्त्याच्या अवस्थेवरून स्पष्ट झाले आहे.जतच्या निकृष्ट रस्त्याच्या कामांची वरिष्ठ स्तरावरून पाहणी करून पुन्हा दर्जेदार कामे करावीत,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ठेकेदार नामनिराळे,दुय्यम ठेकेदार पदाधिकारी

जत शहरात गेल्या वर्षभरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांच्या रोषाला नगरपरिषदेत व लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागले होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी खर्च करत कामे करण्यात आली आहेत. यात मुख्य ठेकेदार नामनिराळे आहेत.प्रत्यक्षात अनेक रस्ते कामाचा अनुभव नसलेल्या पदाधिकाऱ्यां कडून रस्त्याची कामे केले आहेत.यात जास्तीत जास्त पैसे मिळविण्यासाठी कामे केल्याचे स्पष्ट आहे.काही रस्त्याची बिले निघण्या अगोदरचं रस्ते उखडले आहेत.
अधिकाऱ्यांकडून कमिशनमुळे डोळ्यावर पट्टी
जत शहरातील हे सर्व रस्ते करताना सार्वजनिक बांधकाम व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना ठरलेले कमिशन पोहच झाल्याने त्यांच्याकडून डोळ्यावर पट्टी बांधून कामाची पाहणी करण्यात आल्याचे नागरिकांचे आरोप आहेत.त्यामुळे रस्ते तयार कोन करतयं,कसे करतंय याकडे कुणीही डूकूनही बघितलेले नाही.त्यामुळे चकाचक झालेले रस्ते चार महिन्यात उखडले आहेत.या कामाकडे दुर्लक्ष करून बेजबाबदार पणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
जत शहरातील रस्त्याची सहा महिन्यात झालेली आवस्था
