आंसगी तुर्क मधील आरोग्य सेविकेस मारहाण | जवानाविरोधात गुन्हा दाखल
जत,प्रतिनिधी : आंसगी तुर्क(ता.जत) येथील एका आरोग्य सेविकेस मारहाण केल्याप्रकरणी एका जवानावर गुन्हा उमदी पोलीसात दाखल करण्यात आला.खडकी (पुणे) येथे जवान म्हणून कार्यरत असणारे व सध्या रजेवर गावी आलेले शकील मोहम्मद जहागीरदार (वय-43)असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शकीरा कादर मनेर या आसंगी तुर्क ता.जत याठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत.दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान उपकेंद्रात संशयित शकील जहागीरदार हा येऊन आरोग्य सेविका शकीरा मनेर यांना माझ्या भावास होम क्वोरोंटाईन का केले?
असे म्हणत शिवीगाळ करत, मी आर्मी ऑफिसर आहे, हे ओळखपत्र बघ,बीपी ऑपरेटर मशीन दाखव अशी एकेरी भाषेत भाषा वापरली.तसेच तु काय डॉक्टरला जन्मली आहे का? असे लज्जास्पद बोलणे करत आरोग्य सेविकेच्या कानशिलात मारली व तिच्याच हातातील मोबाईल घेऊन तिला मारून मोबाईल ही फोडला आणि तुला बघुन घेतो, तू नोकरी कशी करतेस बघतो असे म्हणत आरोग्य सेविकेला धमकावलेची फिर्याद शकिरा मनेर हीने दिली आहे.
शासकीय कामात अडथळा,साथरोग कायदा भंग केल्या प्रकरणी 353,354,332,504,506 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे करत आहेत.
कोरोनाचा प्रभाव वाढत असताना कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना मारहाण करण्याचा जत तालुक्यातील दुसरा प्रकार आहे.अशा प्रकाराने कोरोना विरोधातील मोहिमेत अडथळे येत आहेत.
