मोहन माळी स्कूलच्या फी मध्ये कपात | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बाधिलकी जपणार ; बिनव्याजी शैक्षणिक कर्ज सुविधा उपलब्ध
कवटेमहाकांळ ; जगात झालेल्या कोरोनाच्या प्रभावामुळे सातत्याने होत असलेल्या लॉकडाऊनचा फटका यंदा सर्वच स्तरातील लोकांना बसला आहे.अशाच आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना मोहन माळी स्कूलच्या व्यवस्थापनाने मदतीचा हात देऊ केला आहे. या शैक्षणिक वर्षापासून स्कूलच्या फी मध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याची माहिती,संस्थापक/अध्यक्ष मोहन माळी यांनी दिली.
मोहन माळी म्हणाले,सध्या सांगली जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.ग्रामीण, शहरी भागातील सर्व स्तरातील लोकांना याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे.या सर्व गोष्ठीचा विचार करत एक सामाजिक बांधिलकी म्हणून सीबीएससीचा परवाना प्राप्त मोहन माळी इंटरनँशनल स्कूलने चालू शैक्षणिक वर्षापासून फी मध्ये कपात केली आहे.

त्याशिवाय आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांना स्कूलच्या वतीने 0℅ टक्के व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे.या काळात पालकांना मदत करणे,किंबहुना विद्यार्थ्यांचे आर्थिक संकटामुळे नुकसान होऊ नये या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतला आहे.यांमुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणांची संधी मिळणार आहे. यांचा जत,कवटेमहाकांळसह सांगली पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन,मोहन माळी यांनी केले आहे.
