जतेत कोरोना आणखीन दोन बळी | बाधित संख्या 194 ; दोघे नवे कोरोना पॉझिटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शुक्रवारी कोरोना बाधित दोघाचे बळी गेले. उपचारा दरम्यान त्याचे मुत्यू झाले.जतमधील 46 वर्षीय व्यक्ती व बालगावमधील 60 वर्षीय व्यक्तीचा मुत्यू झाला.आतापर्यत मुत्यू झालेली संख्या आठ झाली आहे.
गुरुवारी जत शहरातील दोघाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जत शहरात नुकताच मुत्यू झालेल्या एका तरूणांच्या आई कोरोना बाधित आढळून आली आहे.तर शहरातील प्रमुख बाजार पेठतील टेलर व्यवसायिक व माजी संरपच असलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जत शहरातील संख्या आता 44 वर पोहचली आहे.

जत शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध आरोग्य विभागाकडून सुरू आहे.जत तालुक्यातील पुर्व भागासह ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा प्रभाव काहीअंशी कमी होताना दिसत आहे.तालुक्यात 194 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.तर आजअखेर 112 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.तर 72 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.आतापर्यत तालुक्यात आठ जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
