बिळूरला कोरोना मुक्त करणाऱ्या योध्दाचा सत्कार
बिळूर,वार्ताहर : बिळूर ता.जत गावाला मोठे परिश्रम करून कोरोनातून मुक्त करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आले.मौजे बिळूर हे तालुक्यातील कोरोना हॉट स्पॉट बनले होते.जवळपास 68 रुग्ण कोरोना बाधित आढळून गाव लॉकडाऊन करण्यात आले होते.दररोज वाढत असलेले बाधित रुग्ण सापडत होते.दुर्देवाने 1 जण मृत्युमुखी पडला होता.गावाला कोरोनाने विळखा घातल्याने भितीचे वातावरण पसरले होते.या काळात तालुका वैद्यकीय विभाग,बिळूर प्राथमिक आरोग्य केंद्र,त्यांचे डॉक्टर्स, कर्मचारी, आशा वर्कर,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी,महसूलचे मंडलधिकारी,तलाठी,कोतवाल,पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठ्या कृष्ठाने बिळूरला कोरोना मुक्त केले आहे. त्यांच्या या कृष्ठाचे चिज झाले असून गेल्या वीस दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.त्यामुळे कोरोना मुक्त गाव झाले आहे.या सर्व योध्दाचा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील,चंद्रकांत गुददोडगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जमदाडे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात मोठ्या हिंमत्तीने जीव धोक्यात घालून या विविध विभागातील कोरोना योध्दांनी गावाला वाचविले आहे.अगदी सदन असणाऱ्या बिळूरला कोरोनाच्या महामारीने घेरले होते.या काळात जिगरबाज प्रशासनाच्या बरोबरीने नागरिकांनीही धिराने तोंड देत कोरोनाला हरविले आहे.ते सर्वजण कौतुकास पात्र आहेत.या लढाईनंतरही आपल्या अडचणी संपल्यात असे न समजता प्रशासनाचे नियम, सोशल डिस्टसिंग,मास्कचा वापर नागरिकांनी करावा.
कोरोना योद्धा सरपंच नागनगौडा पाटील,उपसरपंच मेजर धोडमनी,डॉ. प्रमोद कांबळे,डॉ क्षिरसागर,डॉ.कापसे आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी,नर्स आणि आशा वर्कर,गावकामगर तलाठी शिंदे त्यांचे सर्व कर्मचारी,ग्रामविकास अधिकारी आनंद राठोड व त्यांचे सर्व कर्मचारी,लॉकडाऊन काळात नागरिकांना चोवीस तास जीवनावश्यक,गरजेच्या वस्तूचे घरोघरी पोहच करण्याचे शिवधनुष्य पेलेले शिवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते या सर्वांना मार्गदर्शन करणारे पंचायत समिती सदस्य रामण्णा जीवनावर,ग्रा.प.सदस्य बसप्पा जमगोंड,अनाप्पा गडीकर,शिवषणकर कदम,कामगोंड सावकार,जि.स.काईपुरे आदी योध्दाचा शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.प्रमोद कांबळे,सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील,यांची भाषणे झाली.सरपंच नागनगौडा पाटील यांनी आभार मानले.

बिळूरला कोरोना मुक्त करण्यात योगदान दिलेल्या योध्दांचा सत्कार करण्यात आला.
Attachments area