महादेव पाटील यांच्या निधीतून 5 हजार मास्कचे वाटप

0



डफळापूर, वार्ताहर : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जि.प.सदस्य महादेव पाटील यांनी त्यांच्या जि.प.स्विय निधीतून डफळापूर परिसरातील कुडणूर,शिंगणापूर,जिरग्याळ,मिरवाड,खलाटी गावातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पाच हजार मास्क व प्रत्येक ग्रामपंचायतीस पाच लिटर सँनिटाइजर,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स,थर्मामीटर,ऑक्सिमीटर,हॅन्डग्लोज,थर्मल सेन्सरचे वाटप केले.  

डफळापूर ग्रामपंचायतीत वितरणांंचा कार्यक्रम संपन्न झाला.जि.प.सदस्य महादेव पाटील,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण यांच्याहस्ते या साहित्य अंगणवाडी सेविकांच्या कडे वितरणासाठी देण्यात आले.

यावेळी बोलताना महादेव पाटील म्हणाले,कोरोना काळात आरोग्य विभागासह,ग्रामपंचायतीचे कर्मचारी कष्ट घेत आहेत.या अडचणीच्या काळात जनतेनी धीराने या महामारीला सामोरे जाण्याची गरज आहे.आम्ही नागरिकांच्या संरक्षणासाठी काम करत आहोत.सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करत सर्व नियम पाळावेत,असे आवाहनही पाटील यानी केले.



Rate Card

यावेळी ग्रामपंचायत सदस्य देवदास पाटील, राम पाटील,उत्तम संकपाळ,माजी दादा दुधाळ,उपसंरपच सावध पाटील,शामा शुंभळे,ग्रामविकास अधिकारी एस.एस.कोरे,आशासेविका,अंगणवाडी सेविका,व अन्य मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.




डफळापूर ता.जत येथे मास्क,सँनिटाईजरचे वाटप करताना महादेव पाटील,अभिजीत चव्हाण, दिग्विजय चव्हाण आदी

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.